हिंदु धर्मीय कधी ‘प्रभु श्रीरामामुळे आपण कोरोनाला पराजित करू शकलो’, असे म्हणतील का ?
तेलंगाणा राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे संचालक जी. श्रीनिवास राव यांनी येशूला श्रेय दिले त्याप्रमाणे हिंदु धर्मीय कधी ‘प्रभु श्रीरामामुळे आपण कोरोनाला पराजित करू शकलो’, असे म्हणतील का ?
‘आम्ही कोरोनाला स्वतःच्या कर्तृत्वामुळे नव्हे, तर येशू ख्रिस्ताचा आशीर्वाद आणि दया यांमुळे पराजित केले. प्रभु येशूमुळेच भारताने इतकी प्रगती केली आहे’, असे विधान तेलंगाणा राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे संचालक जी. श्रीनिवास राव यांनी नाताळानिमित्त कोठागुडेम येथील एका कार्यक्रमात केले.’ (२३.१२.२०२२)