सकारात्मकतेने पहाणारी आणि गुरुदेवांप्रती अपार भाव असणारी पुणे येथील ६७ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. प्रार्थना महेश पाठक (वय ११ वर्षे) !
‘एकदा मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला. तेव्हा आमच्यात झालेले संभाषण पुढे दिले आहे.
१. प्रत्येक प्रसंगाकडे सकारात्मक दृष्टीने पहाणारी कु. प्रार्थना पाठक !
कु. प्रार्थना पाठक : ‘परम पूज्य, मी या सत्संगाला येत असतांना फार जोरात पाऊस येत होता. तेव्हा ‘वरुणदेव आपल्या सत्संगात आले आहेत आणि आपला आशीर्वाद घेत आहेत’, असे मला वाटले.
परात्पर गुरु डॉ. आठवले : दैवी बालके सर्व प्रसंगांकडे कशी सकारात्मक दृष्टीने पहातात ना ! नाहीतर आम्ही विचार करू, ‘जोरात पाऊस येत आहे, तर सत्संगाला कसे जायचे ?’ पुष्कळ छान !
२. कु. प्रार्थना पाठक हिचा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती असलेला अपार भाव
२ अ. कु. प्रार्थनाने ‘परात्पर गुरु डॉ. आठवले प्रत्येक युगात असतात; म्हणून मी त्यांच्या समवेत असते’, असे सांगणे
कु. प्रार्थना पाठक : सत्य, त्रेता आणि द्वापर या युगांत आपण आमच्या समवेतच होता.
परात्पर गुरु डॉ. आठवले : परंतु तुम्ही पुनःपुन्हा जन्म का घेता ? मोक्षाला का जात नाही ?
कु. प्रार्थना पाठक : आपण आहात; म्हणून मी येते.
२ आ. प्रार्थनाला जाणवलेले प्रत्येक युगातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे रूप आणि साधकांची रूपे
कु. प्रार्थना पाठक : त्रेतायुगात सर्व साधक वानरसेना होते.
परात्पर गुरु डॉ. आठवले : अरे, प्रार्थना कशी योग्य बोलते ना. श्रीरामाचे त्रेतायुग !
कु. प्रार्थना पाठक : ‘मी एक लहान खारुताई आहे’, असे मला वाटले. द्वापरयुगात श्रीकृष्ण होता. तेव्हा आम्ही सर्वजण गोप-गोपी होतो. आता कलियुगात आम्ही सर्व साधक आहोत आणि आपण विष्णु आहात.
परात्पर गुरु डॉ. आठवले : वयाने मोठा असलेला एखादा साधक असा विचार करू शकतो का ?
– कु. प्रार्थना पाठक (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ११ वर्षे), पुणे