(म्हणे) ‘छत्रपती संभाजीराजे यांनी धर्माचा पुरस्कार केला नाही !’ – अजित पवार, विरोधी पक्षनेते
नागपूर, ३१ डिसेंबर (वार्ता.) – आपण जाणीवपूर्वक छत्रपती संभाजी महाराज यांना ‘स्वराज्यरक्षक’ म्हणतो. काही जण संभाजी राजांना ‘धर्मवीर’ म्हणतात. राजे कधीही ‘धर्मवीर’ नव्हते. त्यांनी कधीही धर्माचा पुरस्कार केला नाही, असे वक्तव्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अंतिम आठवडा चर्चेत बोलतांना केले.
Ajit Pawar | छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते; त्यांनी धर्माचा पुरस्कार केला नाही: अजित पवार #marathinews #ajitpawar #zee24taas pic.twitter.com/XH6K0JX03X
— ZEE २४ तास (@zee24taasnews) December 30, 2022
मी मंत्रीमंडळामध्ये असतांना छत्रपती संभाजी महाराज यांना ‘स्वराज्यरक्षक म्हणा’, असे जाणीवपूर्वक सांगत होतो, असे या वेळी अजित पवार म्हणाले. (स्वत:चे राजकीय धोरण चालवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांच्या हिंदुत्व अन् हिंदु धर्म यांच्यासाठी दिलेल्या योगदानाविषयी संभ्रम निर्माण करणार्यांचा सर्व हिंदु समाजाने निषेध करायला हवा ! – संपादक) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्योतिषाकडे गेले असल्याच्या वृत्ताविषयी बोलतांना पवार यांनी ‘श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांमध्ये गफलत होत अहे. महाराष्ट्रात अंधश्रद्धा चालणार नाही’, असे वक्तव्य करून ज्योतिषशास्त्राला अंधश्रद्धा ठरवण्याचा प्रयत्न केला. (स्वत:चे पुरोगामित्व दाखवण्यासाठी ज्योतिषशास्त्राला अंधश्रद्धा ठरवण्यापूर्वी प्रथम त्याचा अभ्यास तरी केला आहे का ? – संपादक)
संपादकीय भूमिका
|