माजी पोप बेनेडिक्ट १६ वे यांचे निधन
व्हॅटिकन सिटी – माजी पोप बेनेडिक्ट १६ वे यांचे ३१ डिसेंबर या दिवशी येथे निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते. गेल्या काही काळापासून ते आजारी होते. सध्याचे पोप फ्रन्सिस यांनी काही दिवसांपूर्वी माजी पोप बेनेडिक्ट यांच्यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले होते.
Former Pope Benedict, died on December 31, 2022 aged 95 in the Mater Ecclesiae Monastery in the #Vatican where he had lived since his resignation, a spokesman for the Holy See said. https://t.co/il6w6KX10l
— The Hindu (@the_hindu) December 31, 2022
पोप फ्रन्सिस नेहमीच माजी पोप बेनेडिक्ट यांना भेटण्यासाठी जात असत. माजी पोप बेनेडिक्ट हे वर्ष २००५ ते २०१३ या काळात पोप पदावर होते. माजी पोप बेनेडिक्ट यांच्या निधनाविषयी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.