पाकिस्तानी हिंदु क्रिकेटपटूवर भारतातील अपघातग्रस्त क्रिकेटपटूविषयी सहानुभूती व्यक्त केल्यामुळे धर्मांधांकडून टीका !
पंतप्रधान मोदी यांच्या मातोश्रींच्या निधनाविषयी संवेदना व्यक्त केल्यावरूनही टीका
नवी देहली – भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंत यांच्या भीषण अपघातानंतर अनेकांनी त्यांच्याविषयी सहानुभूती व्यक्ती केली. त्यात पाकिस्तानमधील हिंदु क्रिकेटपटू दानिश कनेरिया यांनीही ट्वीट केले होते. त्यांनी म्हटले होते, ‘माता राणी (देवी), ऋषभवर तुझी कृपा राहू दे. मी आशा करतो की, तो लवकर बरा होईल.’ यावर अनेक मुसलमानांनी सामाजिक माध्यमांतून त्यांच्यावर टीका केली आहे. नोमान अझहर नावाच्या व्यक्तीने कनेरिया यांना म्हटले, ‘तू हिंदू आहेस का ?’ ओसामा कुरैशी याने कनेरिया यांना आईवरून शिवीगाळ केली, तर जाहिद अब्बास यानेही अपशब्द म्हटले.
‘ऋषभ पंत पर माता कृपा रखना’: दानिश कनेरिया का ‘माता रानी’ को याद करना कट्टरपंथियों को नहीं सुहाया, पूछा- तू हिंदू है क्या#Rishabhpant #DanishKaneriahttps://t.co/L4gXBUZssA
— ऑपइंडिया (@OpIndia_in) December 30, 2022
दानिश कनेरिया यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्रींच्या निधनावरही संवेदना व्यक्त केली. त्यावरही धर्मांध मुसलमानांनी टीका केली. इब्राहिम अहमद याने ही संवेदना रा.स्व. संघासाठी करण्यात आल्याचे सांगितले.
संपादकीय भूमिकायातून धर्मांध मुसलमानांची विकृत मानसिकता लक्षात येते ! भारतातील निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी अशा धर्मांधांची नेहमीच तळी उचलत असतात, हे लक्षात घ्या ! |