कोरोनाची वास्तविक माहिती द्या !
जागतिक आरोग्य संघटनेने चीनला फटकारले
जिनिव्हा (स्वित्झर्लंड) – चीनमधील कोरोनाची हाताबाहेर गेलेली स्थिती पहाता त्याविषयीची वास्तविक माहिती देण्याचा आदेश देत जागतिक आरोग्य संघटनेने चीनला फटकारले. कोरोनामुळे चीनमध्ये सध्या रुणालयांलमध्ये जागा शेष नाहीत, तर स्मशानात अंत्यसंस्कार करायला लांबच लांब रांगा लागल्या आहेत. त्यामुळे स्वतःची अपकीर्ती होऊ नये, यासाठी चीनने कोरोनाविषयीची आकडेवारी प्रतिदिन न देता मासातून एकदाच देण्याची घोषणा केली होती. त्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेच्या चिनी अधिकार्यांशी झालेल्या एका बैठकीत वरील आदेश दिला.
WHO एक्सपर्ट्स और चीनी अधिकारियों के बीच में वर्तमान कोरोना मामले, वैक्सीन, ट्रीटमेंट जैसे मुद्दों पर विस्तार से चर्चा हुई #China #Covid19https://t.co/j2y9riAgWj
— AajTak (@aajtak) December 30, 2022
यासह जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनापासून वाचण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लस आणि वर्धक मात्रा (बूस्टर डोस’) यांचे महत्त्वही पुन्हा एकदा अधोरेखित केले. या बैठकीत जागतिक आरोग्य संघटनेने चीनकडे रुग्णालयात भरती होणारी कोरोना रुणसंख्या, अतीदक्षता विभागात असलेली रुग्णसंख्य, कोरानामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या आदींविषयी महिती मागितली. याखेरीज शारीरिकदृष्ट्या कमकूवत आणि वयोवृद्ध यांच्या लसीकरणाची आकडेवारीही नियमितपणे घोषित करण्याचा आदेश चीनचा ‘राष्ट्रीय आरोग्य आयोग’ आणि ‘राष्ट्रीय रोग नियंत्रण अन् प्रतिबंध विभाग’ यांच्या प्रशासनाला दिला.