पाद्री राजू कोक्केन याला अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी ७ वर्षांची शिक्षा !
केरळमधील ‘पोक्सो’ न्यायालयाने ९ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर सुनावली शिक्षा !
थिरूवनंतपूरम् – केरळमधील त्रिशूरजवळील सेंट पॉल चर्चमधील ४० वर्षीय पाद्री राजू कोक्केन याला ९ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आली होती. केरळमधील ‘पोक्सो’ (प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस) न्यायालयाने पाद्री राजू कोक्केन याला ९ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर नुकतीच केवळ ७ वर्षांचा सश्रम कारावास आणि ५० सहस्र रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली.
POCSO court sentences paedophile padre Kokken after nine long years https://t.co/VdDZihC7r1
— HinduPost (@hindupost) December 31, 2022
१. पीडित अल्पवयीन मुलगी कोक्केन हा पाद्री म्हणून कार्यरत असलेल्या चर्चमधील ‘होली कम्युनियन’ (चर्चमध्ये पवित्र विचारांची आदान-प्रदान) वर्गात सहभागी झाली होती.
२. पाद्य्राने गरीब कुटुंबातील या मुलीला कपडे देण्याचे आश्वासन देऊन खोलीत नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. पाद्य्राने त्याच्या भ्रमणभाषवर या मुलीची नग्न छायाचित्रे काढली होती. ती समाजात प्रसारित करण्याच्या नावाखाली पाद्य्राने तिच्यावर अनेक वेळ बलात्कार केला.
३. न्यायाधीश बिंदू सुधाकरन यांनी कोक्केन याला शिक्षा सुनावली. ‘दंडाची रक्कम पीडित मुलीला द्यावी. दंड न भरल्यास पाच मास अतिरिक्त कारावास भोगावा लागेल’, असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.
संपादकीय भूमिका
|