नेते परदेशी सहली काढतात; मात्र रायगडावर जात नाहीत ! – लेखक विश्वास पाटील
पिंपरी – परदेशातून आलेल्या शिष्टमंडळाला रायगडाविषयी आकर्षण आहे. सर्वच पक्षांतील नेते सहपरिवार परदेशी सहलीसाठी जातात; मात्र काही मोजके नेते वगळले, तर इतर नेते रायगडाला भेट देत नाहीत, अशी खंत लेखक विश्वास पाटील यांनी व्यक्त केली. पहिले ‘इंद्रायणी साहित्य संमेलन’ मोशी येथे संपन्न झाले. या संमेलनाच्या समारोपाच्या वेळी दिलेल्या मुलाखतीत त्यांनी स्वत:च्या भावना व्यक्त केल्या. संदीप तापकीर यांनी विश्वास पाटील यांची मुलाखत घेतली. मुलाखतीमध्ये त्यांनी लेखक म्हणून झालेली वाटचाल आणि पुस्तकांसाठी निवडलेल्या विषयांच्या संदर्भात भाष्य केले.
संपादकीय भूमिकाराजकीय नेत्यांची उदासीनता गडकोटांच्या संदर्भात आहेच, हे यातून अधोरेखित होते ! |