नोएडा (उत्तरप्रदेश) येथील औषध आस्थापनावर धाड
भारतीय आस्थापनाने बनवलेलेे कफ सिरप घेतल्याने १८ मुलांचा मृत्यू झाल्याचे प्रकरण
नवी देहली – उझबेकिस्तानमध्ये भारतीय आस्थापनाचे कफ सिरप घेतल्याने १८ मुलांचा मृत्यू झाल्याचा दावा तेथील सरकारने केला होता. त्यानंतर केंद्रशासनाच्या विविध संस्था आणि उत्तरप्रदेशचा अन्न आणि औषध विभाग यांच्या एका पथकाने नोएडा येथील आस्थापनाच्या कार्यालयात धाड टाकली. उत्तरप्रदेश सरकारच्या एका अधिकार्याने सांगितले की, ‘मॅरियन बायोटेक’ आस्थापन भारतात खोकल्याचे औषध ‘डॉक-१ मॅक्स’ विकत नाही. त्याची निर्यात केवळ उझ्बेकिस्तानला होते.
#Uzbekistan cough syrup deaths: Syrup maker #MarionBiotech stops all manufacturing at #Noida plant#CoughSyrupDeaths https://t.co/D6eaFXTxCZ
— DNA (@dna) December 30, 2022