विधानभवनाच्या पायर्यांवर विरोधकांचे राज्यपालांच्या विरोधात घोषणा देत आंदोलन !
नागपूर, ३० डिसेंबर (वार्ता.) – ‘राज्यपाल झाले भाज्यपाल’.., ‘महाराष्ट्राचे एकच म्हणणे द्या हाकलून हे बुजगावणे..’ अशा घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्यांवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विरोधात आंदोलन केले. या प्रसंगी विधान भवनाच्या पायर्यांवर २ बुजगावण्यांची हंडी फोडण्यात आली. ‘आंदोलनकर्त्यांनी काळ्या टोप्या फिरवत महाराष्ट्राचे बुजगावणे त्वरित हाकला, राज्यपाल हटवा, महाराष्ट्र वाचवा.., चोर है चोर है राज्यपाल चोर है..’ अशा घोषणा दिल्या, तसेच शेतकरी जसे शेतात बुजगावणे उभारतात, तसेच विधान भवनाच्या पायर्यांवर बुजगावणे मांडून विरोधकांनी विधानभवनाच्या पायर्यांवर आंदोलन केले. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.