आमदार नितीन देशमुख यांच्यावर नोंद झालेल्या गुन्ह्याची माहिती घेऊ आणि त्यांच्यावर अन्याय होणार नाही हे पाहू ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
नागपूर – शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) आमदार नितीन देशमुख यांच्यावर पोलिसांनी ३५३ ‘अ’ गुन्हा नोंद करून त्यांना अटक करणार असे सांगितले आहे. नितीन देशमुख हे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांना भेटण्यासाठी गेले होते. त्या वेळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी त्यांच्यासमवेत गैरवर्तन केले आणि त्यांना आत जाण्यापासून रोखले. त्यांच्याकडे विशिष्ट असा ‘पास’ मागण्यात आला. त्यामुळे पोलिसांकडून विशिष्ट पक्षाच्या आमदारांनाच त्रास देण्याचे काम चालू आहे. तरी ३५३ ‘अ’ कलमाचा दुरुपयोग चालू आहे, असा आरोप शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी विधान परिषदेत केला. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘‘आमदार नितीन देशमुख यांच्यावर नोंद झालेल्या गुन्ह्याची माहिती घेऊ ’’, असे सांगितले.