‘हस्त आणि पाद सामुद्रिक शास्त्रा’च्या संदर्भातील संशोधन कार्यात सहभागी होऊन साधनेच्या सुवर्णसंधीचा लाभ घ्या !
‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या अंतर्गत ‘हस्त आणि पाद सामुद्रिक शास्त्रा’च्या संदर्भातील संशोधन कार्यात सहभागी होऊन साधनेच्या सुवर्णसंधीचा लाभ घ्या !
व्यक्तीच्या हाता-पायांच्या तळव्यांवरील रेषा, त्यांचा एकमेकांशी असणारा संयोग, चिन्हे, उंचवटे आणि आकार यांवरून व्यक्तीचा स्वभाव, गुणदोष, आयुर्दाय (आयुष्यमान), भाग्य, प्रारब्ध इत्यादी गोष्टी जाणून घेता येतात. या शास्त्राला ‘हस्त आणि पाद सामुद्रिक शास्त्र’ या नावाने ओळखले जाते. या प्राचीन विद्येच्या संवर्धनासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार संशोधन कार्य करण्यात येणार आहे. हे संशोधन आध्यात्मिक विषयांवर असेल. या कार्यात सहभागी होण्याची संधी आता उपलब्ध झाली आहे.
सध्या फोंडा, गोवा येथील संशोधन केंद्रात हस्त-पाद सामुद्रिक शास्त्रासंबंधी पुढील सेवा उपलब्ध आहेत.
१. संशोधन करावयाचे आध्यात्मिक विषय
१ अ. व्यक्तीला आध्यात्मिक स्वरूपाचा त्रास असणे : व्यक्तीचे अनिष्ट प्रारब्ध आणि काळाची प्रतिकूलता या कारणांमुळे सूक्ष्मातून अस्तित्वात असलेल्या अनिष्ट शक्ती व्यक्तीला विविध प्रकारे त्रास देतात. याला ‘आध्यात्मिक त्रास’ म्हणतात. हस्त-पाद सामुद्रिक शास्त्राद्वारे ‘व्यक्तीला आध्यात्मिक त्रास असल्याचे लक्षात येते का ?’, यासंदर्भात संशोधन करायचे आहे.
१ आ. व्यक्तीचा जन्म उच्च लोकांतून होणे : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी स्वर्ग, महर्, जन आदी उच्च लोकांतून पृथ्वीवर जन्म घेतलेल्या १ सहस्रहून अधिक बालकांना ओळखले आहे. त्यांना ‘दैवी बालक’ ही संज्ञा दिली आहे. ही बालके जन्मतः आध्यात्मिकदृष्ट्या प्रगल्भ आहेत. या बालकांपैकी जे बालक आता युवावस्थेत पोचले आहेत, त्यांचा हस्त-पाद सामुद्रिक शास्त्राच्या दृष्टीने अभ्यास करून ‘त्यांचा जन्म उच्च लोकांतून झाल्याचे लक्षात येते का ?’, यासंदर्भात संशोधन करायचे आहे.
१ इ. संत आणि सद्गुरु यांच्या संदर्भातील संशोधन : गुरुकृपायोगानुसार साधना करून २८.११.२०२२ पर्यंत १२२ साधकांनी संतपद प्राप्त केले आहे. ‘संत आणि सद्गुरु यांचा हस्त-पाद सामुद्रिक शास्त्राच्या दृष्टीने अभ्यास करून त्यामध्ये काही वैशिष्ट्यपूर्ण तथ्ये आढळतात का ?’, याचा अभ्यास करायचा आहे.
आध्यात्मिक त्रास असणार्या व्यक्ती, उच्च लोकांतून जन्म घेतलेली मुले आणि संत अन् सद्गुरु पद प्राप्त केलेले साधक यांच्या हाता-पायांच्या तळव्यांचे काही ठसे अन् छायाचित्रे ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या संग्रही आहेत.
आवश्यक कौशल्य : यासाठी हस्त-पाद सामुद्रिक शास्त्राचे प्राथमिक ज्ञान आणि संगणक हाताळता येणे आवश्यक आहे. (ही सेवा घरी राहूनही करता येईल.)
२. हस्त-पाद सामुद्रिक शास्त्रविषयक ग्रंथांची निर्मिती
हस्त-पाद सामुद्रिक शास्त्राची माहिती समाजाला व्हावी, तसेच नवीन संशोधन होऊन शास्त्राचे संवर्धन व्हावे, यासाठी या शास्त्रासंबंधी ग्रंथांची निर्मिती करण्याचा ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’चा मानस आहे. विश्वविद्यालयाच्या संग्रहात असलेले लिखाण, संदर्भ ग्रंथ आणि नवीन संशोधन यांच्या आधारे ग्रंथांची निर्मिती शक्य आहे. ग्रंथांची निर्मिती जलद गतीने होण्यासाठी लिखाणाचे संकलन करणे, ग्रंथांच्या अनुक्रमणिका सिद्ध करणे, अनुक्रमणिकेनुसार लिखाण लावून त्याचे अंतिम संकलन करणे इत्यादी सेवांसाठी साधकांची आवश्यकता आहे.
आवश्यक कौशल्य : यासाठी हस्त-पाद सामुद्रिक शास्त्राचे प्राथमिक ज्ञान, तसेच संगणक हाताळता येणे आवश्यक आहे. मराठी भाषेचे व्याकरण आणि शब्दरचना यांचे किमान ज्ञान असणे आवश्यक आहे. यामुळे ग्रंथसंकलन शिकवणे सुलभ होईल.
वरील सेवा करण्यास इच्छुक असल्यास; परंतु या सेवेचे कौशल्य नसल्यास संबंधितांना त्या संदर्भातील प्रशिक्षण देण्यात येईल. वरील सेवा करू इच्छिणार्यांनी जिल्हासेवकांच्या माध्यमातून पुढील सारणीनुसार स्वत:ची माहिती mav.research2014@gmail.com या संगणकीय पत्त्यावर किंवा टपाल पत्त्यावर पाठवावी. ई-मेल पाठवतांना त्याच्या विषयामध्ये ‘हस्त-पाद सामुद्रिक’ (Hast-Paad Samudrik) असा कृपया उल्लेख करावा.
टपालासाठी पत्ता
श्री. आशिष सावंत, द्वारा ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय’, भगवतीकृपा अपार्टमेंट्स, एस्-१, दुसरा मजला, बिल्डिंग ए, ढवळी, फोंडा, गोवा. ४०३४०१
(१३.४.२०२२)