साधकांना साधनेत साहाय्य करणारे आणि गुरुमाऊली प्रती उत्कट भाव असणारे पू. शिवाजी वटकर (वय ७६ वर्षे) !
१. प्रेमभाव
अ. ‘पू. वटकरकाकांमध्ये साधकांविषयी पुष्कळ प्रेमभाव आहे. ते लहानांपासून वयस्कर साधकांपर्यंत सर्वांची विचारपूस करतात.
आ. एखादा साधक अबोल असेल, तर त्याला बोलायला प्रवृत्त करण्यासाठी पू. काका स्वतःहून त्याच्याशी बोलतात. त्याला साधनेविषयी दृष्टीकोन देतात. ते अन्य साधकांनाही त्या साधकाशी बोलायला सांगतात.
इ. पू. काका घरी गेलेल्या साधकांनाही भ्रमणभाष करून त्यांची विचारपूस करतात.
२. साधकांना साधनेत साहाय्य करणे
अ. त्यांना ‘प्रत्येक साधक साधनेतील पुढच्या टप्प्यात जावा’, असे वाटते.
आ. ते प्रतिदिन महाप्रसाद ग्रहण करतांना वेगवेगळ्या साधकांच्या समवेत बसतात. त्या वेळी पू. काका साधकांशी संवाद साधत त्यांना आध्यात्मिक दृष्टीकोन देतात.
इ. साधकांना साधनेविषयी काही अडचण असल्यास त्यांना पू. काकांना विचारायला संकोच वाटत नाही. पू. काका नेहमी मनमोकळेपणाने बोलतात.
३. अहंशून्यता
पू. काका साधकांना ‘मी ही गोष्ट तुमच्याकडून शिकलो’, असे सांगतात.
४. गुरुमाऊली प्रती भाव
त्यांना गुरुमाऊलीविषयी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याविषयी) पुष्कळ आत्मीयता आहे.
‘पू. काकांमधील गुण आम्हा साधकांमध्ये येवोत’, अशी गुरुमाऊलीच्या चरणी प्रार्थना आणि कोटीशः नमस्कार ! गुरुमाऊलीने माझ्याकडून पू. वटकरकाकांविषयी लिहून घेतले. त्याबद्दल त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– श्रीमती प्रमिला पाटील (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ८० वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१०.१०.२०२२)