कोणत्याही परिस्थितीत मुंबईतील चित्रपटसृष्टी महाराष्ट्राच्या बाहेर जाऊ देणार नाही ! – मंत्री शंभूराज देसाई
विधान परिषद कामकाज
नागपूर – शिंदे-फडणवीस यांचे सरकार येण्याच्या अगोदर एकही ‘हाय पॉवर समिती’ची बैठक झाली नाही. टाटा एअर बस, फॉक्स वेदांता यांच्यासह अन्य प्रकल्प हे तत्कालीन महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणामुळे राज्याच्या बाहेर गेले आहेत. शिंदे-फडणवीस यांचे सरकार आल्यावर ६२ सहस्र ३५६ कोटी रुपयांच्या ३ प्रकल्पांना मान्यता देण्यात आली असून यामुळे अनेकांना रोजगार मिळणार आहेत. मुंबईतील चित्रपटसृष्टीला कोणत्या कारणासाठी आयुक्तांनी नोटीस काढली आहे ? त्याची माहिती घेऊ आणि मुंबईतील चित्रपटसृष्टी महाराष्ट्राच्या बाहेर जाऊ देणार नाही, असे उत्तर मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत दिले.
सदस्य अभिजित वंजारी यांनी ‘गुजरातच्या निवडणुकीमुळे महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरात राज्यात गेले. त्यामुळे महाराष्ट्रातील तरुणांचा रोजगार बुडत आहे. आता मुंबईतील आयुक्तांनी ‘बॉलिवूड’ अर्थात चित्रपटसृष्टीला तेथील उद्योग बंद करण्याची नोटीस काढली असून तीही तुम्ही गुजरातला नेणार आहात का ?’, असा प्रश्न उपस्थित केला असता मंत्री शंभूराज देसाई यांनी हे उत्तर दिले.