पर्यटनस्थळे आणि रस्त्यांवर हुल्लडबाजी करणार्यांवर कारवाई होणार ! – पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी
३१ डिसेंबरला धार्मिक पर्यटनस्थळे आणि गड-दुर्गांवर पोलीस ठेवणार विशेष लक्ष !
रत्नागिरी – वर्ष २०२३ च्या स्वागतारंभासाठी पर्यटक जिल्ह्यात येऊ लागले आहेत. दापोली, गुहागर आणि रत्नागिरी येथे येणार्या पर्यटकांची संख्या अधिक असून पर्यटकांच्या सुरक्षेवर या ठिकाणी अधिक भर दिला जाणार आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे. ३१ डिसेंबरच्या रात्री जिल्ह्यात मद्यालये रात्री १ वाजेपर्यंत चालू ठेवण्याची अनुमती दिली असल्याने रात्रीच्या वेळी रस्त्यावर बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. मद्यप्राशन करून वाहने चालवणार्यांवर कारवाई केली जाणार आहे. धार्मिक पर्यटनस्थळे आणि गड-दुर्गांवर पोलीस विशेष लक्ष ठेवणार आहेत. पर्यटनस्थळे आणि रस्त्यांवर हुल्लडबाजी करणार्यांवर कारवाई होणार आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली.
रसाळगडावर ३१ डिसेंबरला गडकोटप्रेमी देणार पहारा
खेड – तालुक्यात रसाळगडावर ३१ डिसेंबरच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात पर्यटक येण्याची शक्यता असून २०२३ या वर्षारंभाच्या पार्ट्या होण्याची शक्यता आहे. गडाचे पावित्र धोक्यात येऊ नये, यासाठी गडकोट प्रेमी वैभव सागवेकर आणि रोहित कळंबटे ३१ डिसेंबरला रसाळगडावर पहारा देणार आहेत. याविषयीचे पत्र येथील पोलीसयंत्रणेलाही देण्यात आले आहे.
संपादकीय भूमिकागडाचे पावित्र्य राखण्यासाठी गडकोटप्रेमींना पहारा द्यावा लागणे, हे लज्जास्पद ! |