देहली येथील सरकारी कर्मचारी तौसीफने महिला कर्मचार्यावर वारंवार केला बलात्कार !
महिलांच्या सुरक्षेसाठी करण्यात आले होते तैनात !
नवी देहली – देहली परिवहन खात्याच्या बसमध्ये कार्यरत तौसीफ नावाच्या ‘मार्शल’ने (सुरक्षारक्षकाने) त्याच्या सह महिला कर्मचार्यावर बलात्कार केला. या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. ‘मार्शल’ याच्याकडे प्रवासी, विशेषकरून महिला प्रवाशांचे संरक्षण करण्याचे काम असते. अशातच तौसीफने एका महिलेवर बलात्कार केला, असे ट्वीट महिला पत्रकार मीनाक्षी शरियान यांनी या घटनेची माहिती देतांना केले.
DTC की बस में मार्शल के रूप में तैनात तौसीफ ने महिला के साथ रेप किया व वीडियो बनाया है.
तौसीफ को जिम्मेदारी दी गई थी कि वह महिलाओं की सुरक्षा करेगा लेकिन उसने रेप किया. pic.twitter.com/jnCmjeYPfq
— Minakshi Shriyan (@Minakshishriyan) December 27, 2022
तौसीफने पीडितेला तिचा जन्मदिन साजरा करण्यासाठी त्याच्या घरी बोलावले. तिला गुंगी आणणारे औषध पाजून तिच्यावर बलात्कार केला. त्याचा व्हिडिओ बनवून तो सामाजिक माध्यमांतून प्रसारित करण्याविषयी तिला धमकावले. त्याने तिचे अनेक वेळा लैंगिक शोषण केले. शेवटी कंटाळून पीडितेने याची माहिती तिच्या पतीला देऊन पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली.
संपादकीय भूमिका
|