महाराष्ट्रातील महिलांना न्याय देणारे सरकार ! – सौ. चित्रा वाघ, महिला प्रदेश मोर्चा प्रदेशाध्यक्ष, भाजप
५ सहस्र ५०० आशासेविकांची नियुक्ती !
मुंबई, २९ डिसेंबर (वार्ता.) – येथे ५ सहस्र ५०० आशासेविकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतल्याविषयी भाजप प्रदेश महिला मोर्चाच्या अध्यक्षा सौ. चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले आहे. हा निर्णय घेऊन शिंदे-फडणवीस सरकारने काम करणारे सरकार कसे असते हे दाखवून दिले आहे, असेही वाघ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे.
मुंबईत कोरोना व गोवर प्रसाराच्या पार्श्वभुमीवर गोवर प्रसाराच्या सर्वेक्षणात काही त्रुटी आढळून आल्या त्या दूर करण्यासाठी व मुंबईची आरोग्यव्यवस्था अधिक कार्यक्षम करण्यासाठी ५५०० आरोग्यसेविकांची नियुक्ती करण्याचा महत्वपुर्ण निर्णय शिंदे – फडणवीस सरकारने घेतलाय..
अभिनंदन व आभार 🙏 pic.twitter.com/4Us8XODATa
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) December 29, 2022
सौ. चित्रा वाघ यांनी पत्रकात पुढे म्हटले आहे की, कोरोना आणि गोवर प्रसाराच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरात आरोग्यव्यवस्था आणखी कार्यक्षम करण्यासाठी ५ सहस्र ५०० आशासेविकांची नियुक्ती करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा अधिवेशनात नुकताच घोषित केला आहे. मुंबई महानगरात गोवरविषयी जागृती प्रसारात आरोग्य सर्वेक्षणाच्या त्रुटी आढळून आल्या होत्या. या त्रुटी दूर करण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने ५ सहस्र ५०० आशा सेविकांना सेवेत सामावून घेण्याचा निर्णय घेतला आहे.