विड्याच्या पानाचे औषधी उपयोग

निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक १२२

विड्याचे पान
वैद्य मेघराज पराडकर

‘प्रतिदिन सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी, तसेच दुपारी आणि रात्री जेवण झाल्यावर विड्याचे १ पान चावून खावे. (पान खाण्यापूर्वी त्याचा देठ आणि टोक काढून टाकावे.) यामुळे अंगातील जडपणा न्यून होतो. पचन चांगले होते. हाडे बळकट होतात. सर्दी आणि खोकला झालेला असल्यास तो दूर होण्यास साहाय्य होते आणि आरोग्य टिकून रहाते. विड्याचे पान खाऊन झाल्यावर बोटांनी दात स्वच्छ करून चूळ भरून टाकावी. असे केल्याने ‘दात रापत नाहीत (दातांवर डाग पडत नाहीत)’. तोंड येणे, लघवीच्या मार्गात जळजळ होणे, अंगावर पुरळ येणे, डोळे येणे इत्यादी उष्णतेचे विकार असलेल्यांनी विड्याचे पान खाऊ नये. विड्याचे पान नेहमी उपलब्ध होण्यासाठी याची वेल घरी लावावी.’

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.१२.२०२२)

ही लेखमालिका आचरणात आणतांना आलेले अनुभव ayurved.sevak@gmail.com या ई-मेल पत्त्यावर अवश्य कळवावेत.