भारतीय संस्कृतीत नसल्याने १ जानेवारीला नवीन वर्ष साजरे करू नका !
प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजा सिंह यांचे आवाहन !
भाग्यनगर (तेलंगाणा) – १ जानेवारीला नवीन वर्ष साजरे करणे, ही भारतीय संस्कृती नाही. ही वाईट प्रथा असून युवकांनी आपली संस्कृती समजून घेतली पाहिजे, तसेच जे भारतीय नाही, त्याचे स्वागत आणि उत्सव साजरे करायला नको, असे आवाहन येथील गोशामहल मतदारसंघातील प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजा सिंह यांनी केले आहे. त्यांनी एका व्हिडिओद्वारे हे आवाहन केले आहे.
सौजन्य: Shree Ram Channel Telangana
टी. राजा सिंह यांनी पुढे म्हटले आहे की, १ जानेवारीला नवीन वर्ष साजरा करणे ही भारतीय संस्कृती नसून विदेशी उत्सव आहे. ज्यांनी २०० वर्षे भारतावर राज्य केले, त्या लोकांचा हा उत्सव आहे. हा चुकीचा पायंडा पडत असून युवकांनी जागरूक व्हायला हवे. भारतात वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या दिनांकाला आणि मुहूर्ताला नवीन वर्ष साजरा करण्यात येतो.