पाकिस्तानने स्वतःहून जरी संपूर्ण देश आमच्या कह्यात दिला, तरी तो आम्ही घेणार नाही !
दिवाळखोर पाकिस्तानची तालिबानने उडवली खिल्ली !
इस्लामाबाद (पाकिस्तान) – दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या पाकिस्तानची तालिबानने खिल्ली उडवली आहे. तालिबानी सैन्याचा अधिकारी जनरल मोबिन खान याचा एक व्हिडिओ प्रसारित झाला आहे. यात त्याला विचारण्यात आले, ‘तुम्ही पाकिस्तानची सीमा ओलांडणार आहात का ?’ त्यावर तो उत्तर देतो, ‘पाकिस्तानने स्वतःहून जरी संपूर्ण देश आमच्या कह्यात दिला, तरी तो आम्ही घेणार नाही. त्यांचे कर्ज कोण फेडणार ?’ गेल्या काही दिवसांत तालिबान आणि पाक सैन्य यांच्यात चकमकी उडाल्या आहेत. यात अनेक जणांचा मृत्यूही झाला आहे.