सिंहगडावर कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी आणलेली साडेसात लाख रुपयांची उपकरणे चोरीला
पुणे – सिंहगडावर कचरा प्रकल्पाकरता बसवण्यात आलेली साडेसात लाख रुपयांची उपकरणे अज्ञात चोरांनी चोरल्याने गडाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी वनरक्षक बाळासाहेब जिवडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. रात्रीच्या वेळी गाडीतळ किंवा गडावर सुरक्षा कर्मचारी तैनात नसल्याने गडाची सुरक्षा रामभरोसे असल्याचे दिसून येत आहे. (यासाठी उत्तरदायी असणार्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई होणे आवश्यक ! – संपादक)