जयपूरमध्ये धर्मांधाकडून हिंदु महिलेचा विनयभंग : आरोपीला जाब विचारताच हिंसाचार
वासनांध धर्मांध !
जयपूर (राजस्थान) – जयपूरमधील कृष्णा कॉलनीमध्ये धर्मांधाने एका हिंदु महिलेचा विनयभंग केल्यानंतर दोन्ही समुदायांमध्ये बाचाबाची झाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.
२७ डिसेंबर २०२२ या दिवशी पीडित हिंदु महिलेने एका धर्मांधाने तिचा विनयभंग केल्याची माहिती तिच्या कुटुंबियांना दिली. तिच्या कुटुंबियांनी धर्मांधाला जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता त्याने हुज्जत घातली. त्यामुळे दोन्ही समुदायांमध्ये हाणामारी झाली. दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली. यामुळे परिसरातील वातावरण तणावपूर्ण बनले. या प्रकरणी पोलिसांनी ६ जणांना कह्यात घेतले असून मुख्य आरोपींचा शोध चालू आहे.