गूगल ‘ज्यू’द्वेषीच ! – अमेरिकी संस्थेचा आरोप
गूगलवर ‘ज्यू’ या शब्दाचा ‘कंजुषाप्रमाणे एखादी गोष्ट खरेदी करण्यासाठी प्रयत्न करणारा’, असा देण्यात आला आहे अर्थ !
वॉशिंग्टन (अमेरिका) – गूगल या जगप्रसिद्ध शोध संकेतस्थळावर ‘ज्यू’ शब्द शोधल्यास त्यावर अन्य अर्थांसह ‘कंजुषाप्रमाणे एखादी गोष्ट खरेदी करण्यासाठी प्रयत्न करणारा’, असा अर्थ दिसत असून हा ज्यू समुदायाचा अवमान आहे, असा आरोप अमेरिकेतील एका संस्थेने केला आहे. ‘स्टॉप एँटी सेमिटिझम्’ (ज्यूद्वेष रोखा) नावाच्या संस्थेने हा गंभीर आरोप केला आहे. संस्थेने म्हटले आहे की, ज्यू शब्द शोधल्यावर ज्यूंचा अवमान करणारा अर्थ सर्वांत वर देण्यात आला असून त्याचा वास्तविक अर्थ खाली देण्यात आला आहे. गूगलचे हे वर्तन निषेधार्ह आहे.
यावर इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इलाद स्ट्रोमेयर यांनी याची तत्परतेने नोंद घेत गूगलच्या या कृत्याचा ट्विटरवरून जाहीर निषेध नोंदवला. दुसरीकडे गूगलने यासंदर्भात कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नसले, तरी हा अर्थ आता हटवण्यात आल्याचे समजते.
संपादकीय भूमिका
|