सौदी अरेबियाकडून पाकमधील त्याच्या नागरिकांना सतर्क रहाण्याचा सल्ला !
अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया यांनीही पाकमधील त्याच्या नागरिकांना दिली होती सूचना
इस्लामाबाद (पाकिस्तान) – येथील सौदी अरेबियाच्या दूतावासाने ट्वीट करून त्यांच्या पाकिस्तानात असणार्या नागरिकांना अनावश्यक प्रवास न करण्याचा आणि पंचतारांकित उपाहारगृहात न जाण्याचा सल्ला दिला आहे. यापूर्वी अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया यांनीही त्यांच्या नागरिकांना अशाच प्रकारचा सल्ला दिला होता. गेल्या काही दिवसांत पाकमध्ये आतंकवाद्यांकडून घातपात करण्याच्या काही घटना घडल्या आहेत. ‘तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ नावाची तालिबानी आतंकवादी संघटना पाकमध्ये घातपात घडवून आणत आहे. या पार्श्वभूमीवर या देशांनी त्यांच्या नागरिकांना वरील सल्ले दिले आहेत.
Saudi Arabia’s embassy in Pakistan called on its citizens to exercise caution after the authorities raised the security alert in Islamabad to its highest level on Monday.https://t.co/6eFcP50lwN
— Hindustan Times (@htTweets) December 26, 2022
संपादकीय भूमिका
|