देशी बियाण्यांची लागवड करण्याचे महत्त्व
सनातनची ‘घरोघरी लागवड’ मोहीम
‘देशी वाणांचे (बियाण्याचे) संरक्षण आणि संवर्धन करणे’, ही आज काळाची आवश्यकता आहे. संकरित बियाणे (हायब्रीड बियाणे) अधिक प्रमाणात उत्पन्न देते; म्हणून शेतकरी सातत्याने त्याचाच उपयोग करू लागले आणि परिणामस्वरूप अनेक पिकांच्या देशी जाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. संकरित बियाण्यांच्या लागवडीतून पुढील लागवडीसाठी शेतकर्याला स्वतःचे बियाणे साठवता येत नाही. प्रत्येक वेळी नवीन बियाणे खरेदी करावे लागते. यामुळे शेतकरी स्वावलंबी होऊ शकत नाही. देशी बियाण्यापासून मात्र पुढील लागवडीसाठी बियाणे मिळवता येते. देशी बियाण्यापासून मिळालेले धान्य आणि भाजीपाला संकरित बियाण्यापेक्षा अधिक चविष्ट अन् आरोग्यास चांगला असतो. त्यामुळे शक्यतो देशी बियाणे मिळवून लागवड करावी.’
– सौ. राघवी मयूरेश कोनेकर, ढवळी, फोंडा, गोवा. (२३.१२.२०२२)