अवैध पशूवधगृहे बंद न झाल्यास न्यायालयात जाऊ !
अवैध पशूवधगृहे बंद करण्याविषयी पशूकल्याण अधिकारी शिवशंकर स्वामी यांची बारामती नगरपालिकेस नोटीस !
बारामती (पुणे) – शहरातील अवैध पशूवधगृहे पाडून टाकावीत, अशा मागणीचे निवेदन देऊनही कार्यवाही न झाल्याने राज्यशासनाचे मानद पशूकल्याण अधिकारी शिवशंकर स्वामी यांनी बारामती नगरपालिकेस अधिवक्त्यांद्वारे वैयक्तिक नोटीस दिली आहे. येत्या २ आठवड्यांमध्ये कारवाई न झाल्यास न्यायालयात जाण्याची चेतावणीही त्यांनी दिली आहे. (अवैध पशूवधगृहांवर कारवाई करण्यासाठी निवेदन देणे, नोटीस देणे का करावे लागते ? प्रशासन स्वत:हून कारवाई का करत नाही ? – संपादक) निवासी नायब तहसीलदार विलास करे यांनाही त्यांनी निवेदन दिले आहे.
_____________________________________
बारामती शहरामध्ये अवैधपणे पत्रा शेड ठोकून तेथे गोवंशियांची कत्तल केली जाते. या संदर्भात १० पेक्षा अधिक गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. वर्ष २०१९ पासून सातत्याने पोलिसांच्या सहकार्याने कारवाया केल्या जात असतांना नगरपालिकेकडून कोणतेही सहकार्य मिळत नाही. या कत्तलींमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
|| जय श्रीराम ||
गोरक्षण कार्याची दखल घेणार्या लोकशाही न्यूज चॅनेलचे मनःपूर्वक आभार…दि. 28/12/2022
आपला नम्र –
शिवशंकर स्वामी
नदीपात्रामध्ये मांस, रक्त टाकले असून पर्यावरणाला हानी पोचत आहे. वर्ष २०२० मध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्राशेड बंद करण्याचे आदेश दिले होते; परंतु पत्राशेडच्या मागील बाजूने अवैधपणे व्यवसाय केला जात आहे.