इंदूर (मध्यप्रदेश) येथे हिंदु असल्याचे भासवून धर्मांधाकडून हिंदु महिलेवर बलात्कार
इंदूर (मध्यप्रदेश) – शहरातील नबी अन्सारी याने घटस्फोटित हिंदु महिलेवर ‘नवीन’ असल्याचे सांगत बलात्कार केला. ‘अन्सारी याने धर्मांतरासाठी माझ्यावर दबाव आणला’, असा आरोप पीडित हिंदु महिलेने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत केला आहे. पोलिसांनी अन्सारी याला मुंबईतून अटक केली आहे.
धर्म छुपाकर संबंध बनाए, फिर धर्मांतरण के लिए जान से मारने की धमकी, आरोपी मुंबई से गिरफ्तार-@firozkhan911 की रिपोर्ट#LoveJihadCase #CrimeNews #Indore #MadhyaPradesh https://t.co/xIvTeb5bU0
— ABP News (@ABPNews) December 27, 2022
१. पीडित हिंदु महिला घटस्फोटित असून तिला एक मुलगाही आहे. कुटुंब चालवण्यासाठी ती एका उपाहारगृहात काम करत होती. येथेच तिची भेट नबी अन्सारी याच्याशी झाली. त्याचे नाव ‘नवीन’ असे सांगितले.
२. घटस्फोटामुळे पीडित महिला अस्वस्थ होती. याचा अपलाभ घेत अन्सारी याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. अन्सारी याने पीडितेसोबत तिच्या संमतीशिवाय अनेक वेळा शारीरिक संबंध ठेवले. ‘अन्सारी याने काही दिवसांनी धर्मांतर न केल्यास मला आणि माझ्या मुलाला जिवे मारण्याची धमकीही दिली’, असा पीडीतेचा आरोप आहे.