कोरबा (छत्तीसगड) येथे शाहबाद खान याने केली हिंदु प्रेयसीची हत्या
कोरबा (छत्तीसगड) – येथे शाहबाद खान याने नील कुसुम या त्याच्या हिंदु प्रेयसीवर बलात्कार करून नंतर तिची स्क्रू ड्रायव्हरद्वारे हत्या केली. शवविच्छेदनाच्या अहवालानुसार या तरुणीची मान, छाती आणि शरिराचे इतर भाग यांवर स्क्रू ड्रायव्हरने २६ वार करण्यात आले होते. पोलीस शाहबाद खान याचा शोध घेत आहेत. शाहबाद गुजरातमध्ये कामाला होता. नील हिचे अन्य कुणावर तरी प्रेम असल्याची त्याला माहिती मिळाल्याने तो विमानाने कोरबा येथे आला आणि त्याने नील हिची हत्या केली. तो छत्तीसगडच्या जशपूर येथील रहाणारा आहे.
(सौजन्य : Zee News)
संपादकीय भूमिकाअशा खुन्यांना फाशीची शिक्षा कधी होणार ? |