(म्हणे) ‘हिंदूंना देशातून हाकला, त्यांना नोकरीवरून काढा, भारतीय उत्पादनांवर बहिष्कार घाला !’
‘अल् कायदा’चे इस्लामी देशांंना आवाहन !
नवी देहली – जिहादी आतंकवादी संघटना ‘अल् कायदा’ने इस्लामी देशांमध्ये रहाणार्या मुसलमानांना तेथे रहाणार्या हिंदूंवर आणि भारताच्या उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले आहे. तसेच काश्मीरमधील आतंकवादी कारवायांना प्रोत्साहन देण्यासाठी मुसलमानांकडून साहाय्य मागितले आहे. अल् कायदाच्या नियतकालिकामध्ये एक लेख प्रकाशित करण्यात आला आहे. यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या माजी प्रवक्त्या नूपुर शर्मा यांच्यावर टीका करण्यात आली आहे.
Al-Qaida targetted India over remark made by Nupur Sharma against Prophet Muhammad.https://t.co/r3BANUb1re
— IndiaToday (@IndiaToday) December 27, 2022
या लेखात म्हटले आहे की,
१. मुसलमान जगत गप्प रहात असल्याने भारतातील हिंदुत्वनिष्ठ सरकारने मर्यादाचे उल्लंघन करत महंमद पैगंबर यांचा अवमान केला आहे. आम्ही या हिंदु सरकारच्या विरोधात संघटित होण्यासाठी आणि भारतातील आपल्या बंधू-भगिनींना साहाय्य करण्याचे आवाहन करत आहोत जेणेकरून अल्लाचे शत्रू आमच्या पैगंबरांचा अवमान करण्याचे धाडस पुन्हा करू शकणार नाहीत.
२. आम्ही सर्व मुसलमानांना, विशेषतः व्यापार्यांना भारतीय उत्पादनांवर बहिष्कार घालणे, हिंदु कर्मचार्यांना नोेकरीवरून काढून टाकणे आणि इस्लामी देशांतून त्यांना हाकलून लावण्याचे आवाहन करतो. मोदी यांच्या समर्थकांना पैगंबरांच्या देशांमध्ये राहू देणे, हा अवमान आहे.
संपादकीय भूमिका
|