चॉकलेट घशात अडकून एक वर्षाच्या मुलीचा मृत्यू
सातारा, २७ डिसेंबर (वार्ता.) – चॉकलेट घशात अडकल्याने कोडोली परिसरातील शर्वरी सुधीर जाधव या १ वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला. शर्वरीला एका मुलीने जेलीचे चॉकलेट खाण्यास दिले. तिने चॉकलेट खाल्ल्यानंतर ती खोकू लागली. नंतर ती बेशुद्ध पडली. हे कुटुंबियांच्या लक्षात येताच तिला सातारा जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. याविषयी आधुनिक वैद्य साळुंखे यांनी शहर पोलीस ठाण्यात माहिती दिली.