गोवंशियांची अनधिकृत वाहतूक : आरोपीला न्यायालयीन कोठडी
रत्नागिरी – वाहन चालवणे आणि पशूवैद्यकीय अधिकार्यांचा परवाना नसतांना ३ गोवंशियांची वाहतूक करणारा संशयित शशांक संजय सावंत (रा. साठरेबांबर, सावंतवाडी, रत्नागिरी) याला पोलिसांनी अटक करून न्यायालयात उपस्थित केले असता न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
२६ डिसेंबरला रात्री ८.१५ वाजता बावनदी ते पाली दरम्यान वेळवंड रस्त्यावर शशांक सावंत हा बोलेरो पिकअप वाहन घेऊन जात होता. या वाहनाची चौकशी करण्यासाठी पोलिसांना वाहन थांबवले असता या गाडीच्या हौद्यात ३ गोवंश दोरीने करकचून बांधलेले आढळले. अधिक चौकशी करता संशयिताकडे वाहन चालवण्याचा आणि पशूवैद्यकीय अधिकार्यांचा परवाना नव्हता.
पोलिसांनी ३ गोवंश आणि पिकअप गाडीसह ३ लाख ४२ सहस्र रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस फौजदार मोहन कांबळे यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा नोंद केला.
संपादकीय भूमिकागोवंशियांची वारंवार होणारी अवैध वाहतूक, हा संबंधित आरोपींवर ठोस कारवाई न केल्याचा परिणाम ! |