अलीगड येथील अवैध मशीद हटवण्यास गेलेल्या प्रशासनाच्या पथकाला मुसलमानांचा विरोध!
बरेली रेल्वे स्थानकावरील थडगे पाडण्यासही विरोध
बरेली (उत्तरप्रदेश) – अलीगड येथे अवैधरित्या बांधलेली मशीद आणि बरेली रेल्वे स्थानकावरील थडगे न्यायालयाच्या आदेशानंतर हटवण्यासाठी पोचलेल्या प्रशासकीय पथकाला विरोध झाला. अलीगड येथे समाजवादी पक्षाचे माजी आमदार हाजी जमीर उल्लाह यांच्या नेतृत्वखाली मशीद हटवण्यास विरोध केला. तसेच बरेली रेल्वे स्थानकावरील थडगे हटवण्यास काँग्रेसने नेते मेहंदी हसन यांच्या नेतृत्वाखाली मुसलमानांनी विरोध केला.
१. अलीगडच्या शाहपूर येथील मशीद ज्या भूमीवर बनवण्यात आली आहे, त्या भूमीवर २ जण दावा करत होते. यात एक हिंदु आणि एक मुसलमान होतेे. हे प्रकरण न्यायालयात गेल्यावर न्यायालयाने हिंदु व्यक्तीच्या बाजूने निकाल दिला. २६ डिसेंबर या दिवशी उपजिल्हाधिकारी आणि प्रशासकीय पथक या भूमीचे नियंत्रण हिंदु व्यक्तीला देण्यासाठी पोचले असता त्यांना मुसलमानांनी विरोध केला. या वेळी हिंदु व्यक्तीने १० लाख रुपये घेऊन करार करत वाद मिटवला. (प्रशासन किंवा पोलीस हतबल असल्यामुळे धर्मांधांच्या दबावाला बळी पडणारे हिंदू ! हा भूमी जिहादचाच प्रकार आहे ! – संपादक)
२. बरेलीच्या रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक १ वरील थडगे न्यायालयाच्या आदेशावरून २८ डिसेंबरपर्यंत हटवण्याची नोटीस देण्यात आली आहे. याला मुसलमानांकडून विरोध केला जात आहे. हे थडगे ५०० वर्षे जुने असल्याचा दावा मुसलमानांकडून केला जात आहे. काँग्रेसचे नेते डॉ. मेहंदी हसन यांचे म्हणणे आहे या थडग्यामुळे कुणालाही त्रास होत नाही. (आज ज्या ठिकाणी थडगे आहे, त्याचे रूपांतर मशिदीत झाल्यास आश्चर्य वाटणार नाही. त्यामुळे प्रशासनाने यावर कारवाई करणे आवश्यक आहे ! – संपादक)
संपादकीय भूमिका
|