उत्तरप्रदेशमध्ये हिंदूंच्या धर्मांतराचा प्रयत्न करणार्या पाद्य्रासह २ जणांना अटक !
रामपूर (उत्तरप्रदेश) – येथील पटवई आणि मिलक या भागात नाताळच्या वेळी हिंदूंच्या धर्मांतराचा प्रयत्न केल्यावरून पोलिसांनी २ जणांना अटक केली आहे. पटवई येथील सोहना गावामध्ये पाद्री पोलूम मसीह हा तंबू ठोकून १०० हून अधिक दलित हिंदूंचे धर्मांतर करण्याच्या प्रयत्नात होता. याची माहिती हिंदु संघटनांना मिळाल्यावर त्यांनी पोलिसांना याविषयी कळवले. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाद्री पोलूम याला अटक केली.
Church priest arrested over forced religious conversion in Rampur, Uttar Pradesh https://t.co/xoDa2mQyjl
— OpIndia.com (@OpIndia_com) December 26, 2022
मिलक येथे एक तरुण धर्मांतर करण्यासाठी ३० ते ४० हिंदूंना बसमध्ये बसवून देहली येथे घेऊन जात होता. याची माहिती हिंदु संघटनांना मिळाल्यावर त्यांनी बस थांबवून चौकशी केल्यावर तेथे वाद झाला. याची माहिती पोलिसांना देण्यात आल्यावर पोलिसांनी घटनास्थळी येऊन हिंदूंना धर्मांतरासाठी नेऊ पहाणार्या शिवदेश नावाच्या तरुणाला अटक केली.
संपादकीय भूमिकाउत्तरप्रदेशमध्ये धर्मांतरविरोधी कायदा असतांनाही अशा प्रकारच्या घटना घडत असतील, तर धर्मांध ख्रिस्त्यांना कायद्याचा धाक बसलेला नाही, हे लक्षात येते. हे थांबवण्यासाठी शिक्षा आणखी कठोर करण्याची आवश्यकता आहे ! |