हिंदु राष्ट्र आंदोलनाला सशक्त बनवा ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
हिंदु जनजागृती समितीतर्फे धनबाद (झारखंड) येथे दोन दिवशीय ‘हिंदु राष्ट्र अधिवेशना’चे आयोजन
धनबाद (झारखंड) – हिंदूंना अनुकूल राज्यव्यवस्था होण्यासाठी भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करणे आवश्यक आहे. त्यासाठी हिंदूंनी संघटित होऊन लोकशाही मार्गाने हिंदु राष्ट्र आंदोलनाला सशक्त बनवावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी केले. हिरापूर येथील अग्रेसन भवनमध्ये समितीच्या वतीने आयोजित केलेल्या दोन दिवसांच्या ‘हिंदु राष्ट्र अधिवेशना’त ते बोलत होते.
अधिवेशनाचा प्रारंभ संतांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाला. अधिवेशनाच्या उद्घाटन सत्रामध्ये ‘भारत सेवाश्रम संघा’ चे स्वामी प्रज्ञात्मानंद महाराज, कथाकार तथा प्रबोधनकार स्वामी लोचन महाराज आणि ‘इस्कॉन’चे नामप्रेम प्रभु यांनी मार्गदर्शन केले. या अधिवेशनात झारखंड, बंगाल आणि बिहार या राज्यांमधील हिंदुत्वनिष्ठ सहभागी झाले होते.
आपण हिंदु राष्ट्राच्या उंबरठ्यावर आहोत ! – स्वामी लोचन महाराज, कथाकार तथा प्रबोधनकार
समाजात दुहेरी व्यवस्था चालू आहे. एक वर्ग ‘मनुस्मृती’सारख्या धर्मग्रंथांची मोडतोड करून त्यांना प्रसारित करत आहे. त्यामुळे आपण सर्वांनी मनुस्मृतीचा अभ्यास करून सत्य जाणून घेतले पाहिजे. आपण हिंदु राष्ट्राच्या उंबरठ्यावर आहोत; परंतु वर्ष १८५७ च्या क्रांतीच्या वेळी स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर असतांनाही आपल्याला स्वातंत्र्य मिळाले नाही. तसे या वेळी होऊ नये; म्हणून आपण हिंदु राष्ट्राच्या उंबरठ्यावर असतांनाही सतत प्रयत्न करणे आवश्यक आहे.
मंदिरांचे सरकारीकरण बंद झाले पाहिजे ! – श्री वृंदावन दास महाराज, बंगालमध्ये मंदिरांच्या संघटन कार्यात अग्रेसर
आपली मंदिरे धर्माची केंद्रे आहेत. सहस्रो वर्षे पुरातन मंदिरांचे आज सरकारीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे अनेक मंदिरे जर्जर अवस्थेत आहेत. प्राचीन हिंदु परंपरांचे प्रतिक असलेल्या मंदिरांची पुनस्र्थापना करण्यासाठी त्यांचा पुनरुद्धार करणे आवश्यक आहे.
लहानपणापासून मुलांना धर्मशिक्षण देणे आवश्यक ! – डॉ. नील माधव दास, संस्थापक, ‘तरुण हिंदू’, झारखंड
आज चालू असलेले धर्मांतर थांबवण्यासाठी आपल्याला सनातन धर्माची मुळे लहानपणापासूनच मुलांच्या मनात ठसवली पाहिजे. आजपर्यंत मी ३ मुसलमान कुटुंबाची ‘घरवापसी’ करून त्यांना परत हिंदु धर्मात घेतले आहे आणि अन्य मुसलमानांचीही घरवापसी करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत.
अधिवेशनामध्ये ‘लव्ह जिहाद’ विषयावर परिसंवादाचे आयोजन
या अधिवेशनामध्ये ‘हिंदु राष्ट्र’, ‘बंगालमधील हिंदूंची सुरक्षा’ आणि ‘संघटनामध्ये येणार्या समस्या आणि उपाय’ या विषयांवर परिसंवाद आयोजित करण्यात आला. यात समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे, अधिवक्ता संतोष कुमार, पत्रकार श्री. विद्युत् वर्मा, रा.स्व. संघाचे श्री. शरद पवार आणि समितीचे पूर्व अन् पूर्वाेत्तर भारत राज्य समन्वयक श्री. शंभू गवारे यांनी सहभाग घेतला.
या वेळी लव्ह जिहादविषयी बोलतांना श्री. रमेश शिंदे म्हणाले, ‘‘जेथे हिंदु धर्मात एका गोत्रात विवाह होत नाहीत. दुसरीकडे मुसलमान समाजात चुलत भाऊ-बहिणी यांचा विवाह होतो, ज्यामुळे ‘जेनेटिक म्युटेशन’ (अनुवंशिक आजार) होते. त्यामुळे इस्लामच्या रक्षणासाठी हिंदु मुलींशी विवाह करण्याच्या उद्देशाने लव्ह जिहादचे षड्यंत्र चालू आहे.’’
या वेळी ‘भ्रूण जिहाद’च्या समस्येवर चर्चा करण्यात आली. श्री. रमेश शिंदे म्हणाले, ‘‘मोठ्या वयाच्या हिंदु महिलांसमवेत ‘लिव्ह इन रिलेशन’मध्ये राहून धर्मांधांकडून अनेक मुलांना जन्माला घातले जाते. लव्ह जिहादमध्ये अडकलेल्या मुलींकडे महिला आयोगाने लक्ष देणे आवश्यक आहे.’’