सकाळी ८ ते ९ ही व्यायाम करण्यासाठी सर्वांत योग्य वेळ !
निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक ११९
‘ब्राह्ममुहूर्तावर (पहाटे ४ ते ६ या वेळेत) उठून व्यायाम करण्यापेक्षा या कालावधीमध्ये नामजप, वाचन, लेखन इत्यादी मन आणि बुद्धी यांच्याशी संबंधित कामे करावीत. या कालावधीमध्ये वातावरणात सत्त्वगुण पुष्कळ अधिक प्रमाणात असतो. याचा लाभ करून घ्यावा. व्यायाम रजोगुणप्रधान कृती आहे. त्यामुळे तो सकाळी सूर्याेदय झाल्यावर करावा. सकाळी ८ ते ९ ही व्यायाम करण्यासाठी सर्वांत योग्य वेळ आहे. या वेळेत उघड्या ठिकाणी व्यायाम केल्यास अंगावर ऊन पडून शरिरात ‘ड’ जीवनसत्त्व बनण्याची प्रक्रियाही आरंभ होते. या वेळेत व्यायाम करणे शक्य नसल्यास स्वतःच्या सोयीनुसार कोणत्याही वेळेत व्यायाम केला, तरी चालतो.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.१२.२०२२)
ही लेखमालिका आचरणात आणतांना आलेले अनुभव ayurved.sevak@gmail.com या ई-मेल पत्त्यावर अवश्य कळवावेत. |