धार्मिक भेदभाव करणारे ‘हलाल प्रमाणपत्र’ देण्यावर भारतात बंदी आणावी ! – कोपरगाव येथील हिंदुत्वनिष्ठांची मागणी
कोपरगाव (जिल्हा नगर) – धार्मिक भेदभाव करणारे ‘हलाल प्रमाणपत्र’ देण्यावर भारतात बंदी आणावी, अशी मागणी येथील हिंदुत्वनिष्ठांनी केली आहे. अन्नपदार्थांना धर्मावर आधारित ‘हलाल प्रमाणपत्र’ देणे बंद करण्याविषयी आणि हलाल संबंधित विविध गोष्टींच्या संदर्भात नायब तहसीलदार मनीषा कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले. या वेळी परितोष दरपेल, योग वेदांत सेवा समितीचे बबनराव शिरसाठ, मनसेचे उत्तर नगर जिल्हाप्रमुख संतोष गंगवाल, हिंदुत्वनिष्ठ विलास गोंदकर, संजय सोनवणे, अमोल गोंदकर, मयूर कुलकर्णी, विवेक गोंदकर, प्रसाद सारंगधर, गुलशन होडे आणि हिंदु जनजागृती समितीचे दिलीप सारंगधर, तसेच मोठ्या प्रमाणावर धर्माभिमानी आणि व्यापारी उपस्थित होते.