दाऊदशी संबंध ठेवणार्या युवासेना पदाधिकार्याच्या विरोधात आंदोलन !
नागपूर, २६ डिसेंबर (वार्ता.) – दाऊदशी संबंध ठेवणार्या युवासेना नेत्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी २६ डिसेंबर या दिवशी विधानभवनाच्या पायर्यांवर शिंदे-भाजप गटाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांच्याकडून एका महिलेवर अत्याचार झाल्याचा आरोप करत २ दिवसांपूर्वी विधान परिषदेत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानंतर या प्रकरणी शेवाळे यांनी पत्रपरिषद घेत तक्रारकर्त्या महिलेचे दाऊद आणि युवा सेना यांच्याशी संबंध असल्याचा आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर हे आंदोलन करण्यात आले. या वेळी शिंदे-भाजप गटाचे आमदार भरतशेठ गोगावले, संजय बांगर, संजय शिरसाट, टेकचंद सावरकर, आशिष जयस्वाल आदी आमदारांनी युवा नेत्याच्या विरोधात घोषणा दिल्या.