५३ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली ऐरोली (नवी मुंबई) येथील कु. दर्शना साळुंखे (वय १३ वर्षे) !
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! कु. दर्शना साळुंखे ही या पिढीतील एक आहे !
१. प्रेमभाव
‘कु. दर्शना हिच्यामध्ये पुष्कळ प्रेमभाव आहे. ती सर्वांशी मिळून-मिसळून वागते. समवेत कुणी खेळायला नसल्यास ती चिडचिड न करता एकटी खेळते.
२. आनंदी असणे
पूर्वी तिला शाळेतील अभ्यासाचा ताण यायचा. आता मात्र ती आनंदी असते.
३. नीटनेटकेपणा
दर्शना तिचे अंथरूण-पांघरूण, चादरी इत्यादींच्या व्यवस्थित घड्या घालते. प्रत्येक वस्तू जागेवर ठेवलेली तिला आवडते. एखादी वस्तू जागेवर ठेवलेली नसल्यास ती स्वतःहून ती जागेवर ठेवते. ती शाळेत जातांना ‘बूट’, गणवेश, ‘टाय’ व्यवस्थित घालून जाते. तिच्या शिक्षकांनासुद्धा तिचा हा गुण आवडतो. शाळेतील शिक्षक अन्य विद्याथ्र्यांना तिच्यासारखा व्यवस्थित गणवेश परिधान करण्यास सांगतात आणि तिच्याकडून ‘नीटनेटकेपणा’ हा गुण शिकून घेण्यास सांगतात.
४. ती आईला घरकामात साहाय्य करते.
५. साधनेची आवड असणे
दर्शना नियमित २ – ३ घंटे नामजप करते. घरातील सर्व जण साधना करत असल्याने कुणाचा नामजप करायचा राहिला असल्यास ती त्यांना आठवण करून देते.
६. साधनेचे गांभीर्य
ती दिवसभरात तिच्याकडून घडलेल्या चुका वहीत प्रांजळपणे लिहिते. ती तिच्या साधनेचा आढावा उत्तरदायी साधकांना देते. नामजप करण्यापूर्वी प्रार्थना आणि झाल्यानंतर कृतज्ञता व्यक्त करते.
७. चुकांसाठी प्रायश्चित्त घेणे
दर्शना तिच्याकडून चूक झाल्यास उभे राहून ‘नामजप करणे, चहा न पिणे’ अशा प्रकारे प्रायश्चित्त घेते.
८. सेवेची आवड असणे
८ अ. समाजात अध्यात्माच्या प्रसाराचे कार्य करणे : दर्शनामध्ये लहानवयापासूनच साधनेची आवड आहे. ती आईला सेवेत साहाय्य करते. स्वतः नियमितपणे साधनेचे प्रयत्न करून समाजातही तिच्यापरीने अध्यात्माच्या प्रसाराचे कार्य करते.
८ आ. दर्शनाने दिलेले सनातन संस्थेचे एक हस्तपत्रक शाळेच्या मुख्याध्यापकांना पुष्कळ आवडणे आणि त्यांनी ती माहिती शाळेत सर्वांना ध्वनीक्षेपकावर ऐकवणे : सनातन संस्थेकडून सण-उत्सव यांची माहिती देणारी हस्तपत्रके ती वर्गातील १४ मुलांना देते आणि त्यांची नावे लिहून आणते. सनातन संस्थेचे एक हस्तपत्रक शाळेच्या मुख्याध्यापकांना पुष्कळ आवडले. त्यांनी ती माहिती ध्वनीक्षेपकावरून सर्व विद्यार्थी आणि शिक्षक यांना ऐकवली. त्यामुळे १ सहस्र ५०० जणांपर्यंत विषय पोचला.
दोष : हट्टीपणा आणि राग येणे.’
– श्री. समाधान (वडील) आणि सौ. स्वाती (आई) साळुंखे, ऐरोली, नवी मुंबई. (१.६.२०२०)