कधी एखादा मुसलमान ‘सांता क्लॉज’ बनलेला पाहिला आहे का ? – प्रा. सुभाष वेलिंगकर, ‘भारतमाता की जय’ संघटना, गोवा
पणजी (गोवा) – ‘आपण आचरणाने हिंदु नसून, सेक्युलर आणि आधुनिक आहोत, हे दाखवण्यासाठी टिकली, बांगड्या, मंगळसूत्र यांना फाटा देऊन घरात ‘ख्रिसमस ट्री’ ठेवण्याची ‘फॅशन’ वाढली आहे. हे इंग्रजी शिक्षणाचे स्वाभाविक परिणाम आहेत.
आपण आचरणाने हिंदू नसून,सेक्युलर व माॅडर्न आहोत हे दाखवण्यासाठी टिकली,बांगड्या,मंगळसूत्राला फाटा देऊन घरात ख्रिसमस ट्री ठेवण्याची फॅशन वाढलीय! इंग्लिश शिक्षणाचे स्वाभाविक परिणाम! ?
— Subhash Velingkar (@SBVelingkar) December 25, 2022
कुणी कधी एखादा मुसलमान ‘सांता क्लॉज’ बनलेला पाहिला आहे का ? कधीच नाही ! हा फालतू ‘सेक्युलर’ कीडा केवळ हिंदूंनाच डसलेला दिसत आहे’, असे ट्वीट गोव्यातील ‘भारतमाता की जय’ संघटनेचे प्रा. सुभाष वेलिगंकर यांनी केले.
कुणी कधी एखादा मुसलमान ” सांता क्लाॅज ” बनलेला पाहिलाय का?. . Never! . . हा फालतू #सेक्युलर कीडा फक्त हिंदूंनाच डसलेला दिसतोय!#सांता_क्लाॅज #हिंदु #Hindu
— Subhash Velingkar (@SBVelingkar) December 24, 2022