आसाममध्ये १० मासांत ५३ जिहाद्यांना अटक !
गौहत्ती (आसाम) – आसामध्ये मार्च २०२२ पासून आतापर्यंत ५३ जिहाद्यांना अटक करण्यात आली आहेे, अशी माहिती मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी विधानसभेत एका प्रश्नाचे उत्तर देतांना दिली. राज्यात जिहादी कारवायांत ‘विदेशी’ सहभाग असल्याचेही सरमा यांनी सांगितले. याविषयी भाजपचे आमदार टेरोस ग्वाल यांनी प्रश्न विचारला होता.
53 Alleged Jihadis Arrested In Assam So Far: CM Himanta Biswa Sarma 👇https://t.co/jbocvlrwSI@CMOfficeAssam @assampolice #jihadi #jihad #terrorist #arrest #BreakingNews
— The North-Eastern Chronicle (@tnec_IN) December 25, 2022
मुख्यमंत्री सरमा पुढे म्हणाले,
१. अटक केलेल्या जिहाद्यांमध्ये सैफुल इस्लाम उपाख्य हारून राशिद उपाख्य सुमन या बांगलादेशी जिहाद्याचाही समावेश आहे. त्याला बारपेटा येथून अटक करण्यात आली. तो बारपेटा येथील एका मशिदीत इमाम (मशिदीमध्ये प्रार्थना करून घेणारा प्रमुख) म्हणून कार्यरत होता. तो तेथे विद्यार्थ्यांना अरबी भाषाही शिकवत होता आणि त्यांना जिहादी कारवायांशी संबंधित पुस्तके वाटून त्यांना जिहादी कारवयांत आढत होता.
२. अशाच प्रकारे अन्य ५ बांगलादेशी जिहादीसुद्धा लोकांमध्ये जिहादी साहित्य वाटून त्यांना या कारवायांत ओढत असल्याचे उघड झाले; मात्र ते पाचही जण पळून जाण्यात यशस्वी ठरले. तेसुद्धा मशिदीत काम करत होते.
३. अटकेतील जिहाद्यांमध्ये दोघा महिलांचा समावेश आहे. त्यांना राज्यातील धुबरी आणि मोरीगाव येथून अटक करण्यात आली आहे.
४. मार्च २०२२ पासून आतापर्यंत बारपेटा, बोंगाईगाव, मोरीगाव, धुबरी, गोलपाडा, तमुलपू आणि नलबाडी या ७ जिल्ह्यांमध्ये जिहादी कारवायांशी संबंधित एकूण ९ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
संपादकीय भूमिकायावरून आसाम जिहाद्यांनी किती पोखरला आहे, हे लक्षात येते ! सरकारने अशांवर कठोरात कारवाई केली, तरच इतर जिहाद्यांवर वचक बसेल ! |