तुर्भे परिसरात ३५ ते ४० रिक्शांच्या टायरची चोरी !
नवी मुंबई, २६ डिसेंबर (वार्ता.) – तुर्भे परिसरात रिक्शांच्या टायरची चोरी करर्यात येत आहे. यामागे एक मोठी टोळी कार्यरत आहे. अद्यापपर्यंत ३५ ते ४० रिक्शांच्या टायरची चोरी झाली आहे. या प्रकरणी माजी नगरसेवक चंद्रकांत पाटील यांनी वाढत्या चोर्यांना आळा घालण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना पत्र पाठवले असून ‘तुर्भे परिसरातील पोलिसांची गस्त वाढवून जनतेला दिलासा द्यावा’, अशी मागणी त्यांनी पत्रामध्ये केली आहे.