डेहराडून (उत्तराखंड) येथे हिंदु तरुणाशी विवाह करण्यास मुसलमान तरुणीला कुटुंबियांकडून विरोध !
डेहराडून (उत्तराखंड) – येथे हिंदु तरुणाशी विवाह करण्याचा प्रयत्न करणार्या मुसलमान तरुणीच्या कुटुंबियांनी तिचे अपहरण करण्यात आल्याचा आरोप केला. या तरुणीने न्यायदंडाधिकारी न्यायालयात, ‘मी सज्ञान असून स्वतःच्या इच्छेने विवाह करत आहे’, असे सांगितले. या वेळी दोन्ही पक्षांचे लोक, तसेच हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते न्यायालयाबाहेर गोळा झाल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे पोलीस घटनास्थळी पोचले आणि त्यांनी स्थिती नियंत्रणात आणली.
१. मुसलमान तरुणीने १८ नोव्हेंबर या दिवशी हिंदु प्रियकराच्या घरी जाऊन तेथे वास्तव्य करण्यास आरंभ केला. तरुणीच्या कुटुंबियांनी ती बेपत्ता झाल्याची पोलिसांत तक्रार केल्यावर पोलिसांनी तिला प्रियाकराच्या घरातून शोधून काढले. तेव्हा तिने ‘मी सज्ञान असून स्वतःहून येथे रहात आहे’, असे सांगितले.
२. या कालावधीत या दोघांनी एका मंदिरात जाऊन विवाहही केला. त्याला कायदेशीर मान्यता देण्यासाठी त्यांनी न्यायदंडाधिकारी न्यायालयात अर्ज केला होता. यावरून न्यायालयाने त्यांना बोलावले होते. तेव्हा तरुणीचे कुटुंबीय तेथे पोचल्याने तणाव निर्माण झाला होता. ३० डिसेंबर या दिवशी न्यायालयात पुढील सुनावणी होणार आहे. या दोघांनाही संरक्षण देण्याचा आदेश न्यायालयाने पोलिसांना दिला आहे.
संपादकीय भूमिकामुसलमान तरुणाने हिंदु मुलीला फूस लावून पळवून नेल्यावर आणि हिंदूंनी त्याला विरोध केल्यावर हिंदूंना ‘सर्वधर्मसमभावा’चा डोस पाजणारे निधर्मीवादी अशा वेळी कुठे असतात ? |