धर्मांतराचा प्रयत्न करणार्या ख्रिस्ती धर्मप्रचारकांना युवकांनी पिटाळले !
कुसुंबळे (अलिबाग तालुका) येथील आदिवासी पाड्यातील घटना
पनवेल – आमीष दाखवून धर्मांतराचा प्रयत्न करणार्या धर्मप्रचारकांना उत्तर रायगडमधील अलिबाग तालुक्यातील कुसुंबळे आदिवासी पाड्यामधील युवकांनी पिटाळून लावले. ही घटना २५ डिसेंबर या दिवशी घडली.
महाराष्ट्र के रायगड जिले के अलिबाग तहशील के कुसुंबळे ग्राम मे आदिवासीओ का धर्मांतर करने आये ख्रिश्चन मिशनरी ओ को हिंदू युवाओ ने कडा विरोध करके गांव से खदेड दिया.
मै सभी जागृत हिंदूओ का अभिनंदन करता हु.
जय श्रीराम #StopConversion pic.twitter.com/2KIpNCCu9u— Ram Satpute (@RamVSatpute) December 26, 2022
१. ख्रिस्ती मिशनरी कुसुंबळे येथील लोकांना धर्म परिवर्तनासाठी प्रवृत्त करत होते. या गोष्टीला स्थानिक आदिवासी युवकांनी विरोध केला, अशी माहिती बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष राजा केणी यांनी एका व्हिडिओमध्ये दिली आहे.
२. ते म्हणाले, ‘‘धर्मांतराला विरोध करणार्या युवकांच्या पाठीशी बाळासाहेबांची शिवसेना पक्ष नेहमीच खंबीरपणे उभा राहील. या गावात ख्रिस्ती धर्मियांची एकही वस्ती नसतांना ते येथे येऊन धर्माचा प्रसार करत आहेत. याचा आम्ही जाहीर निषेध करतो.’’
संपादकीय भूमिकाधर्मरक्षणासाठी तत्पर असणार्या आदिवासी पाड्यातील युवकांचे अभिनंदन ! |