कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र केंद्रशासित प्रदेश करा ! – उद्धव ठाकरे
नागपूर – बेळगाव, कारवार, निपाणी असा कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र सीमावादाच्या सूत्राविषयी सर्वोच्च न्यायालयाचा जोपर्यंत निकाल येत नाही, तोपर्यंत सीमाभाग केंद्रशासित प्रदेश करावा. सर्व पक्षांनी मराठी बांधवांच्या पाठीशी उभे रहावे, असे आवाहन ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेत २६ डिसेंबर या दिवशी केले.
“सीमावादाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे तोपर्यंत हा भाग केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करावा”; उद्धव ठाकरे https://t.co/kRydDHQkoN
— Mahaenews (@mahae_news) December 26, 2022
महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नाचा प्रस्ताव नियम ९७ अन्वये अंबादास दानवे यांनी सभागृहात सादर केला. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी झालेल्या चर्चेत भाजपचे सदस्य प्रवीण दरेकर यांनी भाग घेतला.