छापखान्यात दैनिक ‘सनातन प्रभात’शी संबंधित सेवा करतांना सेवेच्या ठिकाणी प्रकाश जाणवून स्वतःला आध्यात्मिक लाभ होत असल्याचे जाणवणे
‘दैनिक ‘सनातन प्रभात’ची ‘पश्चिम महाराष्ट्र आवृत्ती’ची छपाई पुणे येथील छापखान्यात केली जाते. तेथे साधक एकत्रित बसून दैनिक ‘सनातन प्रभात’चे अंक मोजणे, त्यांचे गठ्ठे आणि बांधणी करणे’, अशा सेवा करतात. ही सेवा ज्या ठिकाणी केली जाते, त्या ठिकाणी लख्ख प्रकाश जाणवतो. सेवेच्या ठिकाणी पोचल्यानंतर प्रार्थना करून सेवा चालू करताच ‘मला चैतन्य मिळून आध्यात्मिक लाभ होतात’, असे मला जाणवते. देव या चैतन्यदायी सेवेच्या माध्यमातून ‘माझ्यावरील रज-तमाचे आवरण न्यून करत आहे’, असे मला वाटते. सेवा झाल्यानंतर मला हलकेपणा जाणवतो. तेव्हा ‘दिवसभरात किंवा आठवड्यात आलेले रज-तमाचे आवरण देवाने काढले आहे’, असे मला अनेक वेळा जाणवते. ‘घरी केलेल्या नामजपादी उपायांच्या तुलनेत या सेवेत अधिक प्रमाणात आवरण न्यून होत आहे’, असे माझ्या लक्षात येते. ‘हे केवळ सेवेमुळे शक्य होत आहे’, याची अनुभूती मला घेता आली.’
– श्री. प्रशांत पाटील, कोथरूड, पुणे. (२१.१२.२०१९)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |