मलकापूर (कोल्हापूर) येथील महाविद्यालयात हिंदु धर्माविषयी आक्षेपार्ह विधाने करणार्या शिक्षकांकडून क्षमायाचना !
मलकापूर (जिल्हा कोल्हापूर) – येथील ‘मलकापूर हायस्कूल मलकापूर आणि ज्युनिअर कॉलेज’ येथे प्रार्थनेच्या वेळी संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आयोजित व्याख्यानात २ शिक्षकांनी हिंदु धर्म, परंपरा यांविषयी आक्षेपार्ह विधाने केली. त्यांनी ‘देवतांना नैवेद्य दाखवू नये’, ‘दगडाला देव मानू नये’, अशा प्रकारची हिंदुद्रोही विधाने केली. या प्रसंगी १ सहस्र ५०० विद्यार्थी उपस्थित होते. या संदर्भात हिंदु जनजागृती समिती, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, तसेच विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या प्रतिनिधींनी प्राचार्य व्ही.बी. साठे यांना निवेदन देऊन संबंधित शिक्षकांवर कठोर कारवाई करण्याविषयी निवेदन दिले, तसेच संबंधित शिक्षकांना जाब विचारला. यावर संबंधित २ शिक्षकांनी ‘यापुढे असे होणार नाही’, असे सांगितले, तसेच मुख्याध्यापकांनीही ‘यापुढे असे घडणार नाही’, असे लेखी लिहून दिले.
१. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रसाद कुलकर्णी, श्री. अनंत डोणे, श्री. विश्वास पाटील, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचे श्री. मंगेश विभूते, श्री. रूपेश वारंगे, श्री. भरत गांधी, हिंदुत्वनिष्ठ श्री. चारुदत्त पोतदार, तसेच सनातन संस्थेचे श्री. सुधाकर मिरजकर उपस्थित होते. प्राचार्य व्ही.बी. साठे यांनी हिंदुत्वनिष्ठांना ‘तुम्ही तुमची बाजू मांडण्यासाठी शाळेत येऊ शकता’, असेही सांगितले.
२. या संदर्भात हिंदुत्वनिष्ठांनी विचारणा केली असता संबंधित शिक्षकांनी ‘यू ट्यूब’वरील अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे भाषण ऐकून विद्यार्थ्यांसमोर विषय मांडला’, असे सांगितले. याविषयी हिंदुत्वनिष्ठांनी त्यांना ‘साधना आणि परिवर्तन ट्रस्ट यांमधील घोटाळा यांविषयी का सांगितले नाही ?’, असे विचारले असता ते निरुत्तर झाले. (यावरून हिंदु धर्माविषयक काहीही ज्ञान नसतांना सामाजिक माध्यमांवरून ऐकून शिक्षक कशा प्रकारे विद्यार्थ्यांना दिशाभूल करणारी माहिती देऊन त्यांचा बुद्धीभेद करतात, ते स्पष्ट होते. त्यामुळे अशा शिक्षकांवर कठोर कारवाई होणेच अपेक्षित आहे ! – संपादक)
संपादकीय भूमिका
|