लखीमपूर खिरी (उत्तरप्रदेश) येथे मुसलमान पतीकडून धर्मांतरित हिंदु पत्नीची हत्या
लखीमपूर खिरी (उत्तरप्रदेश) – येथील हफीजपूर गावात महंमद वसी याने त्याची पत्नी उमा शर्मा उपाख्य अक्सा फातिमी हिची विजेचा धक्का (शॉक) देऊन हत्या केल्याची घटना समोर आली आहे. हत्येनंतर त्याने उमा हिचा मृतदेह घरामध्ये खड्डा खणून पुरला होता आणि तो २ दिवस तेथेच झोपत होता. वसी याची आई काही दिवसांसाठी नातेवाइकांकडे गेली असतांना ही घटना घडली. ती जेव्हा परत आली, तेव्हा तिने उमाविषयी विचारणा केल्यावर वसी याने तिची हत्या केल्याची माहिती दिली. यानंतर आईने पोलिसांत तक्रार केल्यानंतर पोलिसांनी खड्ड्यातून उमा हिचा मृतदेह बाहेर काढला आणि वसी याला अटक केली. वसी आणि उमा यांना दोन मुले आहेत. या दांपत्यामध्ये नेहमीच वाद होत असत. त्यातूनच ही हत्या झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
Uttar Pradesh: Mohammed Wasi electrocuted wife Uma Sharma alias Aqsha Fatima, buried her body in his room https://t.co/j82KXqwoBv
— OpIndia.com (@OpIndia_com) December 25, 2022
संपादकीय भूमिका
|