हिंदु विद्यार्थ्यांना सांताक्लॉज बनवणे, हे त्यांना ख्रिस्ती धर्माकडे वळवण्याचे षड्यंत्र !
विश्व हिंदु परिषदेचे मध्यप्रदेशातील शाळांना पत्र !
नवी देहली – विश्व हिंदु परिषदेने मध्यप्रदेशातील शाळांना ‘सनातन हिंदु विद्यार्थ्यांच्या पालकांच्या अनुमतीखेरीज मुलांना सांताक्लॉजची वेशभूषा करण्यास आणि ‘ख्रिसमस ट्री’ आणण्यास सांगू नये’, असे म्हटले आहे. यासंदर्भात विहिंपने शाळांना पत्र पाठवले आहे.
विहिंपने या पत्रात म्हटले आहे की, हा प्रकार हिंदु संस्कृतीच्या विरोधात असून हे हिंदु धर्मातील विद्यार्थ्यांना ख्रिस्ती धर्माकडे आकर्षित करण्याचे षड्यंत्र आहे. हिंदु मुलांना सांताक्लॉज बनवून शाळा ख्रिस्ती धर्माचा प्रचार करत आहे. आमच्या हिंदु मुलांना राम बनू द्या, कृष्ण बनू द्या, बुद्ध होऊ द्या, महावीर होऊ द्या, गुरु गोविंद सिंग होऊ द्या; पण सांताक्लॉज होऊ देऊ नका. शाळा हिंदु विद्यार्थ्यांना सांताक्लॉजची वेशभूषा करण्याचा आग्रह करत असेल, तर अशा शाळांच्या विरोधात विहिंप कायदेशीर कारवाई करेल, अशी चेतावणीही या पत्रातून देण्यात आली आहे.
‘भारत ही संतांची भूमी, सँटाची नाही’, हिंदू विद्यार्थ्यांना सांताक्लॉज बनवाल तर…’ विश्व हिंदू परिषदेचा इशाराhttps://t.co/FBFtXEMTYM
— LoksattaLive (@LoksattaLive) December 24, 2022
संपादकीय भूमिकाकॉन्व्हेंट शाळांत हिंदु विद्यार्थ्यांना टिळा, कुंकू लावण्यास, बांगड्या घालण्यास आदी कृती करण्यास बंदी घातली जाते, तर मग हिंदूंच्या शाळांमधून ख्रिस्त्यांचा सण का साजरा करायचा ? |