(म्हणे) ‘भारताशी चांगले संबंध आणि सीमेवर शांतता राखण्यास आम्ही कटीबद्ध आहोत !’ – चीन
बीजिंग (चीन) – चीन भारतासमवेत असलेले संबंध चांगले, स्थिर आणि भक्कम करण्यासाठी सिद्ध आहे. त्याचसमवेत भारत आणि चीन यांच्या सीमेजवळील भागात शांतता राखण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत, असे वक्तव्य चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी केले आहे. काही दिवसांपूर्वी अरुणाचल प्रदेशातील तवांग येथील सीमेवर भारतीय सैन्याने चीनच्या घुसखोरी करणार्या सैनिकांना चोपल्यानंतर प्रथमच चीनकडून अशा प्रकारचे विधान करण्यात आले आहे.
पत्रकारांना संबोधित करताना वांग म्हणाले की, चीन आणि भारत यांनी राजकीय आणि सैनिकी माध्यमांद्वारे संवाद कायम ठेवला आहे. दोन्ही देश सीमावर्ती भागात स्थिरता राखण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही एकत्र काम करण्यास सिद्ध आहोत.
Big statement by #China on #Tawang clash. Chinese foreign minister Wang Yi says, ‘Both countries are committed to upholding stability in the border areas’. India Today’s @Geeta_Mohan shares more details.#IndiaChina #IndiaChinaFaceoff #ITVideo pic.twitter.com/wAs6QsgyB4
— IndiaToday (@IndiaToday) December 25, 2022
संपादकीय भूमिका
|