हिंदूंचे धर्मांतर होत असल्यावरून ३० युवकांकडून नाताळच्या कार्यक्रमावर आक्रमण
चर्चच्या प्रमुखासह ६ जणांना अटक आणि सुटका
उत्तरकाशी (उत्तराखंड) – येथील पुरोला गावात नाताळच्या कार्यक्रमात धर्मांतर होत असल्यावरून गावातील ३० युवकांनी ‘होप अँड लाईट’ या केंद्रावर आक्रमण केल्याची घटना २४ डिसेंबरला दुपारी घडली. या प्रकरणी पोलिसांनी ६ जणांना अटक केली आहे. यात चर्चचा प्रमुख लाजर कुरनेलियुस आणि त्याची पत्नी यांचाही समावेश आहे. आक्रमण करणारे युवक विविध हिंदु संघटनांशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. दोन्ही गटांशी चर्चा केल्यानंतर पोलिसांनी सर्व आरोपींना सोडून दिले. यापूर्वीही गावात अशाच प्रकारची आक्रमण झाल्याचे स्थानिकांनी सांगितले. (याचाच अर्थ येथे हिंदूंच्या धर्मांतराच्या घटना सतत घडत असणार, हे स्पष्ट होते ! तरीही पोलीस आणि प्रशासन निष्क्रीय असेल, तर याकडे राज्यातील भाजप सरकारने लक्ष द्यायला हवे, असेच हिंदूंना वाटते ! – संपादक)
धर्मांतराचा आरोप करत नाताळच्या कार्यक्रमावर ३० युवकांचा हल्ला; चर्चच्या प्रमुखासह सहा जणांना अटकhttps://t.co/nglUU2TGJ7
— LoksattaLive (@LoksattaLive) December 25, 2022
संपादकीय भूमिका
|